नांदगाव येथे काथ्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम

⚡कणकवली ता.०२-: महाराष्ट्र काथ्या धोरण – २०१८ नांदगाव येथे मोफत एक दिवसीय “उद्योजकता परिचय कार्यक्रम” तथा 30 दिवसीय एक “ उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र काध्या धोरण- २०१८’ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग आयोजित मोफत एक दिवसीय “ उद्योजकता परिचय कार्यक्रम” – नांदगाव जि.सिंधुदुर्ग येथील ग्रामपंचायत सभागृह नांदगाव येथे ४ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वा. होणार आहे.
काथ्या उद्योगाचे संवर्धन, प्रचार व प्रसार करण्या करिता या मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून कोकण विभाग काथ्या उद्योग व्यवसाय मधील विविध उद्योग संधी, महाराष्ट्र कोकण विभाग काथ्या धोरण – २०१८ बद्दलची माहिती या सोबतविविध काथ्या उत्पादनांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे काथ्यावर आधारित कुटीरोद्योग कसा करावा बाबत माहिती व मार्गदर्शन तज्ञ व शासकिय- निमशासकीय अधिकाऱ्यांमार्फत केले जाणार आहे. विवीध शासकिय कर्ज योजना व सबसिडी योजनांची माहिती देखील या कार्यक्रमात दिली जाणार आहे
मोफत एक दिवसीय कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या बेरोजगार युवक, युवती, महिला, माजी सैनिक, अपंग, बचत गट सदस्य या सर्वांना नारळाच्या सोडण्या पासून काथ्या तयार करून त्यापासून दोरी तयार करणे, मॅटस तयार करणे, पायपुसण्या तयार करणे, विवीध फॅशनेबल वस्तूंची निर्मिती करणे बाबतच्या अनेक कुटीरउद्योगाची माहिती व मार्गदर्शन करून त्यावर आधारित काथ्या उद्योग- व्यवसाय त्यांनी सुरु करून स्वावलंबी करून त्याना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश या कार्यक्रमाचा आहे, याकरिताच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने १५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयाने काथ्या उद्योग-२०१८ जाहिर करण्यात आलेले आहे.
मोफत एक दिवसीय कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या पात्र युवक- युवतीं करिता पुढे ३० दिवसांचा मोफत “उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे” आयोजन ग्रामपंचायत सभागृह नांदगाव येथे १ महिना कालावधीचा करण्यात येणार आहे. वयोमर्यादा : १८ ते ५० वर्षे पूर्ण , ७ वी पास असणान्या युवक- युवतीनां या कार्यक्रमात सहभागी करण्यात येणार असून या ३० दिवसाच्या प्रशिक्षण कार्यक्रमात, काथ्या उद्योग-व्यवसाया बाबत विस्तृत माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार असून उद्योजकीय गुणसंपदा, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास , सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण, शासकिय-निमशासकिय कार्यालया व्दारे काथ्या उद्योग- व्यवसायांकरिता दिली जाणारी मदत- सहकार्य, सोई-सुविधा, सवलती, इ.योजनांबद्दल माहिती दिली जाणार असून काथ्या उद्योग- व्यवसायांतील अनेक उद्योग- संधी बद्दलची माहिती, शासनाच्या कर्ज व सबसिडी योजनांची माहिती, उद्योग-व्यवसायाचे व्यवस्थापन, उत्पादनाच्या किंमती, मार्केट सर्व्हे, मार्केटींग , डिजीटल मार्केटिंग, प्रकल्प अहवाल इत्यादी विषयांवर उद्योगातील तज्ञ व्याख्याते व अधिकारी वर्गाकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येऊन काथ्या उद्योग घटकास भेटी देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. यशस्वी उद्योजकांचे मनोगत देखील होणार.
मोफत प्रशिक्षणा सोबत पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्या लाभार्थ्याना शासनाचे प्रमाणपत्र तथा २००० विद्या वेतन देखील दिले जाणार असून इच्छुक युवक-युवती, महिलांनी शनिवार ४ मार्च रोजी ग्रामपंचायत सभागृह नांदगाव येथे उपस्थित राहावे असे महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ मुंबई व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page