⚡कणकवली ता.०२-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव गावठणवाडी ते ग्रामदैवत लिंग माऊली देवालयाकडे जाणाऱ्या पुलाला 26 लाख निधी मंजूर झाला असून, या पुलाचे भूमिपूजन भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ओसरगाव सरपंच सौ.सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत,माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे, संतोष कदम, भाजपा कार्यकर्ते दिगंबर परब, जमीनदार बाबु कुलकर्णी, सुभाष मेस्त्री, नाना परब, व ग्रामस्थ उपस्थित होते.
ओसरगाव ग्रामदैवत लिंग माऊली देवालय व पटेलवाडी, गावठणवाडी, मळीवाडी, सडेवाडी, बौद्धवाडी, या सर्व वाड्यांना या पूलाचा साहजिकच उपयोग होणार असल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केलं जातं आहे.
