⚡मालवण ता.०१-: मालवण तालुका व्यापारी संघाच्या सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा व वार्षिक स्नेहमेळावा दि. ५ मार्च रोजी सकाळी ११ वा. एक्झॉटिका- (चिवला. कुरण), धुरीवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मालवण व्यापारी संघांचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम निश्चित करून जाहीर करणे, महासंघाच्या २०२४ च्या निर्याजित ३६ व्या व्यापारी एकता मेळाव्याच्या आयोजनाबाबत चर्चा केली जाणार आहे. महासंघाच्या निर्देशास अनुसरून मालवण व्यापारी संघाच्या पर्यटन, वीज ग्राहक, युवा, महिला आदी सहयोगी समित्या नियुक्त करणे आदी विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
मालवण तालुका व्यापारी संघाचा ५ रोजी स्नेहमेळावा
