बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील उड्डाणपूलासाठी आज दुपारपर्यंत भूमी अभिलेख कार्यालयाने सीमांकन प्रक्रिया पूर्ण केली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आज हद्द कायम न करता यासाठी येत्या आठ दिवसात पुन्हा गाळेधारकांना नोटीसा बजावून हद्द कायम करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येईल असे भुकरमापक एस. आर. पार्टे यांनी सांगितले. त्यामुळे जोपर्यंत हद्द कायम होत नाही तोपर्यंत गाळेधारक संभ्रमावस्थेत आहेत.
बांदा उड्डाणपूलासाठी १९९१ च्या संपादित जमिनीच्या नकाशाप्रमाणे कालपासून मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. काल दिवसभर व आज दुपारपर्यंत सीमांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणींमुळे आज हद्द कायम करण्यात आली नाही. येत्या ८ दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून व त्यानंतर सर्व ८६ गाळेधारकांना पुन्हा नोटीसा बजावून सर्वांच्या उपस्थितीत हद्द कायम करण्यात येणार आहे. त्यामुळे उड्डाणपूलासाठी नेमकी हद्द कुठपर्यंत कायम करण्यात येईल या संभ्रमात स्थानिक गाळेधारक आहेत.
फोटो :-
उड्डाणपुलासाठी जमीन मोजणी पूर्ण
