तृणधान्य पाक कला स्पर्धेत स्नेहलता मेस्त्री प्रथम
⚡मालवण ता.२८-: त्रिंबक येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी मालवण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व ग्राम पंचायत त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमीत्त तृणधान्य पाककला स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. सरपंच किशोर त्रिंबककर, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोपाळ गोसावी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
आचरा मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. किसान गप्पा गोष्टी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून
कृषी विद्दवेत्ता भात संशोधन केंद्र फोंडाघाटचे डॉ शेटये सर यानी सद्य परिस्थितीवर भाष्य करत आंबा पीक मोहोर संरक्षण व किड नियंत्रण या बाबत मार्गदर्शन केले. पौष्टिक तृणधान्यचे आहारातील महत्व सांगितले. मालवण पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी यानी उपस्थितांना संतुलीत आहारा बाबत माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यानी कृषी विभागाच्या विवीध योजना व pmfme योजने बाबत मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे यांनी मार्गदर्शन केले. पाक कला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीम.रचना देसाई, श्री.डी एम.तोरणे यानी काम केले. त्रिंबक ग्रा.प.अंतर्गत ३५ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्नेहलता मेस्त्री यानी प्रथम, सायली त्रिंबककर द्वितीय, सिद्धी गोसावी तृतीय क्रमांक पटकावला. तर मुग्धा बाणे, अस्मिता सुतार,प्राची त्रिंबककर, वर्षा जाधव यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. किसान गप्पा गोष्टी व पाक कला स्पर्धा कार्यक्रम साठी गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशु बागवे, कृषी अधिकारी प.स मालवण श्री कांबळे, एस.जी परब, डी के.सावंत, सरमळकर, एस.डी कदम, एम.बी कदम, ए.डी कुरकुटे, श्रीम अमृता भोगले, श्रीम विद्या कुबल, श्रीम धामापूरकर, श्रीम स्नेहल जीकमडे, श्रीम चौखंडे, श्रीम नेहा वेंगुर्लेकर, श्रीम सपना तेली, श्रीम सावंत, ग्रा.प सदस्य त्रिंबक, त्रिंबक संस्था अध्यक्ष सुरेंद्र सकपाळ सर, संतोष घाडीगावकर, अर्चित लेले, व ठाणेश्वर महिला ग्राम संघ त्रिंबक मधील महिला वर्ग उपस्थीत होत्या.
