ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सावंतवाडी : येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे दरवर्षी जिल्हास्तरावर उपक्रमशील व्यक्तीना विविध क्षेत्रात समाजाभिमुख कार्य केल्याबद्दल मानाचा समजला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यासाठी यावर्षी मंडळाकडून प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या या उपक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, संगीत, पत्रकारिता, क्रीडा व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीनी पंधरा मार्चपर्यंत स्वतःच्या कार्याच्या माहितीचा प्रस्ताव ,चार फोटोसह अध्यक्ष जावेद शेख, एफ- ४९, सालईवाडा, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

या पत्त्यावर पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन वाय.पी.नाईक,उपाध्यक्ष प्रा.रुपेश पाटील, कार्याध्यक्ष निलेश पारकर, सौ.प्रज्ञा मातोंडकर, विनायक गावस यांनी केले आहे

आर.व्ही.नारकर, एस.आर.मांगले , सौ.रश्मी भाईडकर यांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले आहेत.

 पुरस्काराचे हे सलग सतरावे वर्षे असून ,अधिक माहितीसाठी वाय.पी.नाईक (9420204105) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे
You cannot copy content of this page