जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडीची कुशाली गुरव तृतीय

⚡सावंतवाडी ता.२८-: नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्था , ता-सावंतवाडी संस्थेमार्फत स्वा. वि. दा. सावरकर स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आरपीडी प्रशालेतील इयत्ता नववीची विद्यार्थिनी . कुशाली नामदेव गुरव हिने तृतीय क्रमांक पटकाविला.

तीला रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या कामगिरीबद्दल या कु. कुशाली गुरव हिचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकास सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगावकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 💐💐💐

You cannot copy content of this page