मिलाग्रीस प्रशालेमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२८-: येथील मिलाग्रीस प्रशालेच्या भव्यपटांगणावर विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात थोर शात्रज्ञ डॉक्टर सी.वी.रमन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय फादर रिचर्ड सालदाना यांनी डॉक्टर सी वी रमण यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन केले .

या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.या रांगोळी स्पर्धेचा विषय हा मानवी शरीरातील आंतरेंद्रिये असा होता. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.

या दिनानिमित्त कुमारी आर्या राणे व कुमार श्रीराम पाटील यांनी भाषण केले .तसेच प्रशालेच्या पर्यवेक्षिका माननीय सौ मेघना राऊळ टीचर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

विज्ञान दिनाचे औचित्य साधत प्रशालेच्यादावल मलिक अल्लाउद्दीन नदाफ या विद्यार्थ्याला श्रमप्रतिष्ठे साठी मुख्याध्यापकांच्या हस्ते कौतुकाची थाप म्हणून एक सायकल देण्यात आली. आपल्या भाषणात मुख्याध्यापकांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या व श्रमप्रतिष्ठेवर भर देत सदर विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला मिलाग्रीस प्राथमिक विभाग ,हायस्कूल विभाग ,सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ सुकुरीना यांनी केले तसेच रोजा फर्नांडिस टीचर यांनी आभार प्रदर्शन केले.

You cannot copy content of this page