चराठा शाळा नंबर १ दुरुस्तीसाठी तेरा लाख ६० हजार निधी मंजूर

पालकमंत्री चव्हाण यांचे उपसरपंच अमित परब यांनी मानले आभार

⚡सावंतवाडी ता.२८-: तालुक्यातील चराठा शाळा नंबर १ दुरुस्तीसाठी 13 लाख 60 हजार रुपये एवढा निधी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती चराठा उपसरपंच अमित परब यांनी आज येथे दिली.

दरम्यान वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आम्हाला यश आल्याचेही परब यांनी यावेळी सांगितले. यावेळी परब यांनी पालकमंत्री चव्हाण यांचे आभार देखील मानले.

You cannot copy content of this page