सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये एस . एस . सी . विद्यार्थ्यांचा शुभेच्छा सोहळा उत्साहात संपन्न …

⚡सावंतवाडी ता.२६-: मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये” काल एस .एस .सी विद्यार्थ्यांचा शुभेच्छा सोहळा संपन्न झाला .इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा पर भेटवस्तू दिल्या आणि आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या प्रशालेतील आठवणींना पीपीटी शोच्या माध्यमातून उजाळा दिला .

या कार्यक्रमाचे औचित्य साधून सावंतवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती स्नेहा लंगवे मॅडम यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेबद्दल सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेच्या वतीने शाल ,श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला . या
कार्यक्रमाला सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीम . निलोफर बेग , सचिव श्री. हिदायतुल्ला खान , सहसचिव श्री . सुलेमान बेग , सदस्य श्री . परवेज बेग , श्री. रफिक शेख ,प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, पालक – शिक्षक संघ कार्यकारीणी समितीचे इ . दहावी वर्गाचे प्रतिनिधी श्री . अमिर मलिक ,सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी , पालकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते .
सावंतवाडी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम.स्नेहा लंगवे मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम आदर्श नागरिक बनावे, असे मोलाचे मार्गदर्शन केले . तसेच सावंतवाडी केंद्रातील ‘पहिली डिजिटल शाळा ‘म्हणून सेंट्रल इंग्लिश स्कूल या प्रशालेचे कौतुक केले .यावेळी सावंतवाडी मर्कझी जमात , बॉम्बे संस्थेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ,प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी , पालक शिक्षक संघ कार्यकारणी समिती च्यावतीने दहावीच्या पालक प्रतिनिधिनीं विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी मार्गदर्शन केले व एस .एस .सी परीक्षेत भरीव यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाप्रसंगी बोलताना इयत्ता दहावीचे विद्यार्थीही भावूक झाले होते .

You cannot copy content of this page