बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील निमजगा-गवळीटेंब- शेटकरवाडी येथील तरुणांनी ज्येष्ठ नागरिक हनुमंत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील स्मशानभूमीची एकत्र येत श्रमदानाने दुरुस्ती व स्वच्छता केली. संपूर्ण दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून स्मशानभूमीला नवी झळाळी प्राप्त करून दिली.
स्मशानभूमीत वाढलेल्या झाडीची साफसफाई करण्यात आली तसेच शेडची देखील दुरुस्ती करण्यात आली. उन्हाळी दिवसांकरिता नवीन दहन जागा व शेडची डागडुजी तसेच स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील दुरुस्ती करण्यात आली.
लोकांमध्ये जागृती व्हावी याकरिता तेथेच तिन्ही वाड्यांचे स्नेहभोजनही करण्यात आले. त्यानंतर वाड्यांमधील रस्त्यांना पडलेले खड्डे देखील या तरुणांकडून बुजवण्यात आले. या कार्यात ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, प्रशांत बांदेकर यांच्यासह गोविंद वराडकर, उमेश तोरस्कर, अशोक नाईक, रामा पेडणेकर, अशोक मंजिलकर, संजय नाईक, पप्या वझरकर, रामदास सावंत, विराज देसाई, गुरु कल्याणकर, पंकज देसाई, सिद्धेश केसरकर, महादेव आईर, मोहन सावंत, सुशांत वराडकर, रवींद्र सावंत, कैलास सावंत, टमा वडार, सुनील धोत्रे, ओंकार सावंत व सतीश शेटकर यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
बांदा निमजागा – गवळीटेंब- शेटकरवाडी येथील तरुणांनी स्मशानभूमीत राबविली स्वच्छता मोहीम…
