भटवाडी विठ्ठल मंदिर ट्रस्टकडून परशुराम चलवाडींचा सत्कार…

मंदिर परिसरातील सिमेंट काँक्रीटच्या कामाचे केले कौतुक;भविष्यातही नागरिकांसोबत राहू चलवाडींचा शब्द…

⚡सावंतवाडी ता.२५-: भटवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात तेथील नागरिकांच्या मागणीनुसार सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी यांनी स्वखर्चातून सिमेंट काँक्रीटकरणाचे काम केले. त्यांनी केलेल्या कामाबद्दल तेथील रहिवासी लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

दरम्यान या मंदिराचा १४ वा. वर्धापनदिन 24 फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला याचे औचित्य साधून श्री परशुराम चलवाडी यांचे केलेल्या कामाबद्दल कौतुक करून श्री देव विठ्ठल मंदिर व श्री देव दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टमार्फत मंदिरातील भटजी श्री उदय अळवणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर येताना श्री चलवाडी यांनी भविष्यातही आपण भडवाडीतील ग्रामस्थांच्या सोबत राहू असे आश्वासन दिले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप भालेकर श्री शेखर सुभेदार, आबा कशाळीकर सुनील सावंत श्री संजय पेडणेकर व अन्य जेष्ठ मंडळी त्याचबरोबर त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी या ठिकाणी उपस्थित होते.

You cannot copy content of this page