बाबू कुडतरकर; आत्मेश्वर कडून जाणाऱ्या रस्त्याला निधी कोणी दिला याचा आनंद नेवगीना विसर पडला का…?
सावंतवाडी ता.२४-: आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी शहराला अग्निशमन बंब साठी निधी मिळाल्याची माहिती आम्ही दिली मात्र आम्ही हे काम श्रेयासाठी करत नसल्याचा पलटवार बाबू कुडतरकर यांनी केला आहे. दरम्यान श्रेय कोण घेतय हे जनतेला ठाऊक आहे. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. श्री कुडतरकर यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया ग्लोबल महाराष्ट्र चॅनलला दिली.
श्री कुडतरकर पुढे म्हणाले की आनंद नेवगी यांनी आत्मेश्वर ते रानडे घर इकडून जाणारा रस्त्यासाठी पाठपुरावा कोणाकडे केला होता व त्यासाठी निधी कोणी दिला याचा विसर आनंद नेवगी यांना पडला का..? असा सवाल ही बाबू कुडतरकर यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान आम्ही कोणतेही काम श्रेयवादासी करत नसून जनतेच्या सेवे भावासाठी करतो. त्याच भावनेतून आम्ही ही माहिती दिल्याचे कुडतरकर यांनी सांगितले.
