अग्निशमन बंबच श्रेय संजू परबांनाच…

आनंद नेवगी: बाबू कुडतरकारांनी जनतेची दिशाभूल करू नये; आम्ही सत्तेत आल्यानंतर केलेल्या पाठपुरावाला आले यश…

⚡सावंतवाडी ता.२४-: येथील नगरपरिषदेला मिळालेला अग्निशमन बंब संजू परब नगराध्यक्ष असताना त्यांनी शासन स्तरावर केलेल्या पाठपुराव्याचे फलित आहे, उगाच मंत्री केसरकरांचे गुणगान गाऊन बाबू कुडतरकर यानी जनतेची दिशाभूल करू नये अग्निशामक बंबाचे सर्व श्रेय भाजपा आणि माजी नगराध्यक्ष संजू परब यांनाच जाते असा पलटवार माजी नगरसेवक आनंद नेवगी यांनी लगावला.त्यांनी यासंदर्भात ग्लोबल महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली तसेच केलेल्या पाठपुराव्याचे पत्रही दाखवले.

श्री नेवगी म्हणाले, सावंतवाडी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यानंतर सत्ताधारी या नात्याने नगराध्यक्ष संजू परब यांनी अग्निशामक बंबासाठी शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला होता यास पाठपुराव्याने हा अग्निशमन बंब आज या ठिकाणी दाखल झाला आहे. केवळ श्रेय घेण्यासाठी बाबू कुडतरकर हे मंत्री केसरकर यांचे गुणगान गात आहे मात्र जनतेला सर्वज्ञात आहे. असा टोलाही नेवगी यांनी यावेळी लगावला.

You cannot copy content of this page