कळसुलकरमध्ये चिंतन दिन साजरा

⚡सावंतवाडी ता.२३-: लॉर्ड बेडन पाॅवेल यांच्या जयंतीनिमित्त कळसुलकरच्या स्काऊट- गाईडच्या विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशालेत चिंतन दिन साजरा केला.

याप्रसंगी विविध शालेय स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीसांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या गाईड शिक्षिका श्रीमती जे एस पावसकर यांनी केले. सुरुवातीला लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर स्काऊट गीत, झेंडा गीत गायन करण्यात आले. यावेळी खरी कमाई केलेल्या विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून हस्तकलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले.
या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मानकर सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सई शेरलेकर व सृष्टी गावडे यानी केले.

You cannot copy content of this page