⚡बांदा ता.२३-: इन्सुली येथील श्री देवी माऊली मंदिराची फंड पेटी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. बुधवारी पहाटे फंड पेटी फोडण्याचा प्रयत्न करत असलेल्या चोरट्यांची छबी सीसीटीव्ही कैद झाली आहे. दरम्यान देवस्थान कमिटीचे अध्यक्ष कृष्णा सावंत यांना दरवाजे उघडल्याचे निदर्शनात आले.
त्यानंतर त्यांनी सदरची घटना बांदा पोलीस पोलीस ठाण्याला कळवली आहे.
