विश्वास गांवकर उपजिल्हाप्रमुख

जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची माहिती

मालवण दि प्रतिनिधी
गेले काही दिवस सुरु असलेल्या मालवण शिवसेनेतील (शिंदे गट) अंतर्गत मतभेदावर तोडगा काढण्यास पक्षाच्या वरिष्ठांना यश आले असून यापूर्वी मालवण तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या विश्वास गावकर यांची सिंधुदुर्ग उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करत त्यांना पक्ष संघटनेत बढती देण्यात आली आहे. या नियुक्ती बाबतची माहिती जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी दिली आहे. श्री. गावकर यांच्यावर उपजिल्हा प्रमुखपदा बरोबरच कणकवली संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

कणकवली येथे पक्ष पदाधिकारी यांच्या बैठकीतही नियुक्ती जाहीर करत विश्वास गांवकर यांना माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यापूर्वी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात मालवण तालुकाप्रमुख म्हणून महेश राणे, विश्वास गांवकर आणि राजा गावकर या तिघाजणांवर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती तालुक्यात तीन तालुकाप्रमुख नेमण्यात आल्याने तो एक चर्चेचा विषय बनला होता पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे तीन तालुकाप्रमुख नेमण्यात आल्याची चर्चा होती आता विश्वास गांवकर यांची उपजिल्हाप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आल्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम पडला आहे विश्वास गांवकर यांनी गेल्या काही महिन्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांची कार्यतत्परता पाहून त्यांना पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर बोलताना विश्वास गावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात गतिमान विकास होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हाही विकासात अग्रेसर रहावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत, माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत, नेते किरण सामंत, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे प्रयत्नशील आहेत. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे सोबतच पक्ष संघटना वाढवणे यासाठी आपले प्रयत्न राहतील, असे सांगितले.

You cannot copy content of this page