केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन;सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचे केले लोकार्पण …
⚡ओरोस ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल असे लिखाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांनी करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी केले. दरम्यान सिंधुदुर्ग बाळशास्त्री जांभेकर भवन हे राज्यात व देशात आदर्शवत ठरावे या दृष्टीने या भवनात सुसज्ज ग्रंथालयासह पत्रकारीतेत आधुनीक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असेही राणेंने यावेळी सूचित केले. ते पत्रकार भवन उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी नारायण राणें यांच्या हस्ते पत्रकार भवनांचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी राणें पुढे बोलताना म्हणाले की बाळशास्त्री जांभेकर हे मराठी वृत्तपत्रकारितेचे जननायक आहेत. त्यांनी खडतर प्रसंगी काळात समाज प्रबोधनाचे काम केले. समाजाला त्यांनी दिशा देणाचे काम केले. बाळशास्त्री जांभेकर यांचा समाज प्रोबधानाचा वारसा जिल्ह्यातील पत्रकारानी पुढे चालवावा असे आवाहन त्यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन उद्योजक तयार व्हावे यासाठी पत्रकारांनी लिखाण करावे. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे. उद्योगधंद्याच्या माध्यमातून तरुण समृद्ध होऊ शकतो. त्यासाठी आवश्यक सहकार्य माझ्या खात्यामार्फत करण्यात येईल, असे राणे यावेळी बोलताना म्हणाले.
