मुंबई छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची म्युझियम ऑन व्हील्स बस मालवणात

टोपीवाला हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना देण्यात आली प्राचीन वस्तूंची माहिती;आ वैभव नाईक यांनी केली होती शिफारस

मालवण (प्रतिनिधी)

विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळावी या दृष्टीने आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीनुसार मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची “म्युझियम ऑन व्हील्स” या संकल्पनेतील फिरत्या संग्रहालयाची बस आज मालवणच्या टोपीवाला हायस्कुलच्या पटांगणावर दाखल झाली. या बस मध्ये मांडलेल्या विविध प्राचीन वस्तूंच्या प्रतिकृतींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्युझियमचे सदस्य चिन्मय गावडे, विनी प्रतिभा, शांतीनी सुतार, ओंकार डोंगरकर, मयूर भंडारे, शिवाजी तावरे यांचे स्वागत करत सत्कार केला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेनाशहरप्रमुख मंदार ओरसकर, मंदार केणी, पूनम चव्हाण, निनाक्षी मेतर, किरण वाळके, सन्मेष परब, महेंद्र म्हाडगूत, उमेश मांजरेकर, करण खडपे, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.

या फिरत्या संग्रहालयात प्राचीन दगडी व धातूची हत्यारे, भांडी, मुर्त्या, कलाकुसरीच्या वस्तू, वस्त्रे, दागिने, नाणी आदी इतिहासकालीन गोष्टींच्या प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या. याविषयी संग्रहालयाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच इतिहासातील विविध नाण्यांचे छाप काढून त्यांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या फिरत्या संग्रहालयास टोपीवाला हायस्कुल तसेच भंडारी हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी भेट दिली.

You cannot copy content of this page