योगेश जोशी राज्यस्तर प्रथम तर ओजस मेस्त्री जिल्हास्तर द्वितीय
⚡सावंतवाडी ता.२०-: नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत येथील आरपीडी प्रशालेने राज्यस्तरीय यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत योगेश जोशी याने राज्यस्तर प्रथम व ओजस मेस्त्री याने जिल्हास्तर द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. ५ वी ते ९ वीतील एसएससी बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘एमकेसीएल ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२२ अर्थात एमओएम या राज्यस्तरीय स्पर्धा *परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षेसाठी राज्यभरातून २० हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावंतवाडीमधील सरकारमान्य एमएस सीआयटी केंद्र आनंदी कॉम्प्यूटर्स यांच्या विद्यमाने आरपीडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेत आरपीडी प्रशालेचा इ.०७ वीचा विद्यार्थी कु. योगेश विवेकानंद जोशी याने राज्यस्तर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.. त्याबद्दल रोख रक्कम.५ हजार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबतच आरपीडी प्रशालेचा इ.०८ वीचा विद्यार्थी कु. ओजस गोकुळदास मेस्त्री याने जिल्हास्तर द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल रोख १५००/-, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कामगिरीबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे, सर्व मार्गदर्शक शिक्षकवृंद, पालकवर्ग या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष श्री विकास सावंत, सचिव श्री. व्ही. बी. नाईक, खजिनदार श्री. सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री. जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक श्री. एस. पी. नाईक, पर्यवेक्षक श्री. ए. व्ही. साळगांवकर व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक तसेच आनंदी कॉप्युटर्सचे संचालक श्री. मेघश्याम काजरेकर, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
