भरड येथील दत्तमंदिरात ४मार्च ला सभिनय नाट्यगीत स्पर्धा

नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ अष्टपैलू कलानिकेतन चे आयोजन

मालवण दि प्रतिनिधी

येथील अष्टपैलू कलानिकेतनतर्फे ४ मार्च रोजी भरड दत्त मंदिर येथे सायंकाळी ६.३० वा. नाटककार राम गणेश गडकरी यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय सवेश, साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थाध्यक्ष भालचंद्र केळुसकर यांनी दिली.

स्पर्धा, बालगट (१० वर्षांपर्यंत), युवा गट (११ ते १६ वर्षांपर्यंत) व १६ वर्षांवरील खुला गट अशा ३ गटात घेतली जाणार आहे. बालगटासाठी अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये व उत्तेजनार्थ दोन बक्षिसे २०० रुपये व भेटवस्तू युवा गटासाठी अनुक्रमे १२००, ८००, ५०० रुपये व ट्रॉफी, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे ३०० रुपये तसेच खुल्या गटासाठी २०००, १५००, १००० रुपये व ट्रॉफी, उत्तेजनार्थ दोन बक्षिसे ५०० रुपये अशी पारितोषिके दिली जातील.

स्पर्धेसाठी वेशभूषा व रंगभूषा स्पर्धकांनी स्वखर्चाने करायची असून आवश्यकता असल्यास नावनोंदणीची मुदत संपण्यापूर्वी आगावू कल्पना दिल्यास रंग/ वेशभूषाकारांशी संपर्क साधून देण्यात येईल. त्यांच्यामार्फत सशुल्क सेवा उपलब्ध होऊ शकेल. प्रत्येक गटात प्रथम नोंदणी करणाऱ्या १० स्पर्धकांना प्राधान्य दिले जाईल… नाव नोंदणीची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी असून अधिक माहितीसाठी रत्नाकर सामंत (८३९००६२२९०) यांच्याशी संपर्क साधावा.

You cannot copy content of this page