⚡सावंतवाडी ता.१९-: येथील आंबेगाव ग्रामपंचायत व शिवशक्ती कला क्रीडा विकास मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी अनेक रक्तदातांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान नवोदित रक्तदातांनी पुढे येणे गरजेचे आहे असेही आवाहन श्री नाईक यांनी केले.
यावेळी आंबेगाव चे सरपंच श्री शिवाजी परब, कुनकेरी सरपंच सौ संजना सावंत कुणकेरी उपसरपंच श्री सुनिल परब आंबेगाव उपसरपंच श्री रमेश गावडे, आंबेगाव ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश गवळी, सौ.साक्षी राऊळ, सौ आनंदी मुळीक, कुणकेरी ग्रामपंचायत सदस्य श्री अंकिता सावंत, मेस्त्री, कारीवडे पोलीस पाटील प्रदीप केळुसकर, ग्रामसेवक श्री अमित राऊळ, मानवीधिकार न्याय्य सुरक्षा संघटन भारत सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मा. श्री. संजू गावडे, डॉ. शंकर राऊळ,आरोग्य सेवक सदाशिव म्हापसेकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर परब,भाजपा बूथ अध्यक्ष श्री संतोष राणे, रवी गावडे, अण्णा केळुसकर, प्रमोद परब, श्रीहरी गावडे,दाजी तेली, राकेश कुंभार, नितीन केळुसकर, अशोक केळुसकर, राजा राऊळ, प्रथमेश परब, गितेश सावंत, रविंद्र नरेंद्र, समीर काळे, संदीप वरक,संजय राऊळ, एकनाथ सावंत, दर्शन बर्वे उपस्थित होते.
