शिवाजी महाराज यांनी रोपण केलेल्या वटवृक्षस्थळी साजरी झाली शिवजयंती

कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर समोर साजरी झाली एतिहासिक शिवजयंती

मालवण, दि प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वहस्ते कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरासमोर लावलेल्या वटवृक्षाच्या स्थळी आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.

कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी वडाचे एक रोपटे लावले होते. हे स्थळ शिवाजीचा वड म्हणून ओळखले जाते. आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर कांदळगाव ग्रामपंचायत, देवस्थान पदाधिकारी, ग्रामस्थ शिवप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी उपसरपंच दिव्या बागवे, सदस्य अनघा कदम, शारदा मुळये, ग्रामसेवक सागर देसाई, आशिष आचरेकर, गजानन सुर्वे, कांदळगाव देवस्थानचे उपसचिव विशाल राणे, शाखाप्रमुख जीवन कांदळगावकर, श्री. साळकर, श्री. सावंत यांच्यासह युवावर्ग, शिवप्रेमी उपस्थित होते.

You cannot copy content of this page