समाजपयोगी काम करणाऱ्या रोटरी क्लबच्या पाठीशी कायम-;आ नितेश राणे

वैभववाडी संजय शेळके
वैभववाडीचा महोत्सव हा कणकवली महोत्सवच्या तोडीस तोड असा होत आहे. हे पाहून आज खूप आनंद झाला. वैभववाडीकरांच्या अपेक्षेपेक्षा मोठा महोत्सव रोटरी क्लब ने आयोजित केला आहे. समाजपयोगी काम करणाऱ्या अशा संस्था, ट्रस्टच्या मी नेहमीच पाठीशी राहणार असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. पुढील वर्षी होणारा वैभववाडी महोत्सव हा रोटरी क्लब व वैभववाडी नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने होईल, तो आणखी भव्य दिव्य असेल विश्वास ही आ. नितेश राणे यांनी व्यक्त केला.
वैभववाडी इनामदार प्लाझाच्या भव्य पटांगणावर दोन दिवस रोटरी क्लबच्या वतीने वैभववाडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पार पडलेल्या या महोत्सवाचा सांगता समारंभ आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. शुक्रवारी रात्री वैभववाडीत आलेले आमदार नितेश राणे महोत्सवाचे स्वरूप पाहून भारावून गेले. रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष टक्के व त्यांच्या टीमचे त्यानी तोंड भरून कौतुक केले.
यावेळी आमदार नितेश राणे यांनी महोत्सवातील स्टॉलला भेटी देत बचत गटातील महिलांशी संवाद साधला. या महोत्सव मध्ये स्थानिक महिलांना स्टॉल उभारण्याची संधी देण्यात आली होती. ही संकल्पना आमदार नितेश राणे यांना खूप आवडली. सहकुटुंब आलेल्या नितेश राणे यांनी महिलांनी घरगुती बनवलेले खाद्यपदार्थही खरेदी केले. वैभववाडी रोटरी क्लबच्या वतीने अध्यक्ष संतोष टक्के यांनी आमदार नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासिर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर, रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर गोवेकर मॅडम, कणकवली रोटरीचे मा. अध्यक्ष विद्याधर तायशेटे, रोटरी क्लब पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी व वैभववाडीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार पडलेल्या रस्सीखेच स्पर्धेत गणेश नगर वैभववाडी संघाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक नावळे संघाने पटकावला. तृतीय क्रमांक पंचायत समिती वैभववाडी संघाने पटकावला. त्यांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात आले. यास महोत्सवात रेकॉर्डन्स, नृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत स्थानिक महिलांनी, लहान मुलांनी सहभाग घेतला. लोकोपयोगी काम करणाऱ्या मंडळींना पुरस्कार देऊन रोटरी क्लबने गौरव केला.
महोत्सव यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे पदाधिकारी, अध्यक्ष संतोष टक्के, उपाध्यक्ष संजय रावराणे, खजिनदार प्रशांत गुळेकर, संजय सावंत, विद्याधर सावंत, सुनील रावराणे, सचिन रावराणे, मनोज सावंत, मुकुंद रावराणे, प्रशांत कुळये, बंड्या गाड, श्री धावले, सलोनी टक्के, स्नेहल रावराणे, पूजा सावंत, मंगेश कदम, तेजस आंबेकर, महेश संसार, नामदेव गवळी, सुरेंद्र नारकर, संजना रावराणे, सुनील कुंभार व इतर पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो रस्सीखेच स्पर्धत उपविजेता नावळे संघ बक्षीस वितरण करताना आम नितेश राणे छाया संजय शेळके वैभववाडी

You cannot copy content of this page