प्रांजली पाटेकर, वेदिका मोरे अनुक्रमे द्वितीय, तृतीय;शिवजयंती निमित्त घेण्यात आली होती स्पर्धा
वैभववाडी संजय शेळके
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने माध्यमिक शाळांच्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रेया संदीप शेळके प्रथम,प्रांजली प्रकाश पाटेकर द्वितीय, तर वेदिंका दिलीप मोरे तृतीय, उत्तेजनार्थ हर्ष विनोद जांभळे व खुशी गजानन गावणेर, या स्पर्धेमध्ये तालुक्यातील माध्यमिक विद्यालयचे 13 शाळाने सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इशाद शेख यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर महिला तालुकाध्यक्ष माजी सभापती मीनाताई बोडके पोलीस निरीक्षक अमित यादव, वक्ते म्हणून प्रा डॉ पारखे, कणकवली तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, प्रदेश काँग्रेस सदस्य आनंद परुळेकर, माजी मुख्याध्यापक प्रकाश साळुंखे, बाळा सुतार, परब मॅडम, स्पर्धेला परीक्षक म्हणून माझी मुख्याध्यापक दीनदयाळ सर,प्रा सुरेश पाटील, आदी उपस्थित होते. कार्यक्रम सूत्रसंचालन प्राध्यापक संजीवनी पाटीले तर आभार मीनाताई बोडके आणि म्हणले.
फोटो स्पर्धेतील प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करताना जिल्हाध्यक्ष शेख तालुका अध्यक्ष अमित यादव मीनाताई बोडके आदी मान्यवर छाया संजय शेळके वैभववाडी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना ईशाद शेख अमित यादव मीनाताई बोडके आदी मान्यवर छाया संजय शेळके
