पत्रकारांची ताकद मला ज्ञात…

विशाल परब;पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे परब यांच्याहस्ते करण्यात आला सत्कार.

⚡बांदा ता.१९-: मला आज अभिमान वाटतो की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज शहरातील पत्रकार कमी असले तरी खेड्यातील पत्रकार मात्र जास्त आहेत. लोकसंख्या जरी कमी दिसली तरी आमच्या लोकांमध्ये वेगळं कौशल्य आहे. एक पत्रकार काय करू शकतो त्याची ताकद आम्हाला माहिती आहे, असे प्रतिपादन भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी आज येथे केले. ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे श्री परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विशाल परब बोलताना पुढे म्हणाले की, मी कुठलाही आमदार, खासदार नाही. मी सर्वसामान्य घरातील व्यक्ती. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून समाजात जिथे जिथे अडचण येते तिथे माझं नाव घेतले जात. हाच माझा अभिमान आहे. कुठल्याही पक्षामध्ये कुठल्याही व्यासपीठावर जाण्याची माझी ताकद आहे. शत्रुत्व कमी ठेवून मित्रत्व जास्त ठेवण्याचा हा माझा स्वभाव आहे, असे विशाल परब बोलताना म्हणाले.
विशाल परब पुढे बोलताना म्हणाले की आबा खवणेकर हे जिल्ह्यात 100 रुपयाचं पेट्रोल घालून ते जिल्हाभर फिरायचे. परंतु आज त्यांनी एक एक असे करून शंभर व्यक्तीची संघटना तयार केल्याने त्यांच्या कार्याला मी सलाम देतो असेही विशाल परब बोलताना म्हणाले. दरम्यान यापुढेही विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून मराठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सिंधुदुर्ग इलेक्ट्रॉनिक मीडियाला जे जे सहकार्य लागेल ते आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

You cannot copy content of this page