Headlines

पत्रकार निरंतर समाजसेवेचे काम करीत गुप्त राहिलेल्या गोष्टींना वाचा फोडतात

महाराष्ट्र राज्य मराठी. पत्रकार संघ पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमात अर्चना घारे परब यांचे प्रतिपादन

बांदा ता.१९-:लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्याचे काम आपण करीत आहात. २४ तास काम करीत समाजासाठी आपण वाहून घेतले आहे. याबाबत कौतुक करावे तेवढे कमी आहे. राजकारणी आणि पत्रकार यांचे एक अतूट नाते असते. राजकीय व्यक्ती करीत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम तुम्ही करता. राजकीय व्यक्ती, समाज आणि पोलीस यांच्यापर्यंत न पोहोचणाऱ्या गोष्टीला आपण वाचा फोडण्याचे काम करता. राजापूर येथील शशिकांत वारीसे यांचे गेलेले बलिदान फुकट जावू देवू नका. सर्वांनी एकत्र येवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करुया. यासाठी आमची सर्वांची त्याला साथ असेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई सिंधुदुर्ग संलग्न इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठी पत्रकार संघ यांच्या पत्रकार पुरस्कार सोहळ्यात बोलताना केले.

You cannot copy content of this page