⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी फटाके फोडत ‘जय शिवाजी जय भवानी ‘ असा जयघोष करत शिवजयंती साजरी केली.
कणकवली पटवर्धन चौकात खास छत्रपतींच्या किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली होती. यामध्ये छत्रपतींचा पुतळा ठेवण्यात आला
होता.यामध्ये कलमठ येथील युवक,युवतींनी छत्रपती शिवाजी महाराज,मावळे तसेच पारंपारिक नऊवारी साडी डोक्यावर फेटा अशा वेशभूषेत सहभाग घेतला.तसेच लेझिम नृत्य देखील केले.
यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव,महिला तालुकाप्रमुख वैदही गुडेकर,युवा सेना शहर प्रमुख आदित्य सापळे, उपशहर प्रमुख सोहम वाळके,राजू राणे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर,जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर,अनिल हळदीवे, प्रसाद अंधारी,हर्षद गावडे, सचीन आचरेकर,विरा गावडे, स्वरूपा विखाळे,साक्षी अमडोस्कर,रीमेश चव्हाण,सचिन आचरेकर,निसार शेख आदी शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
