मालवण दि प्रतिनिधी
मसुरे डांगमोडे थोरला सडा येथे गतवर्षी सापडलेल्या व प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेल्या शिवलिंग स्थळी आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रम पार पडले या धार्मिक कार्यक्रमांना मसुरे पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शवित दर्शनाचा लाभ घेतला
गतवर्षी मसुरे डांगमोडे मार्गची तड येथे थोरला सड्यावर आकारी ब्राम्हण देवस्थानच्या ठिकाणी महाशिवरात्रीच्या उत्सवावेळी मिश्र धातूची शिव पिंडी आढळून आली होती. ग्रामस्थांनी गतवर्षी त्या शिव पिंडीचे विधिवत प्रतिष्ठापणा केली होती. आज महाशिवरात्रीचे औचित्य साधून त्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले त्यात अभिषेक, लघुरुद्र, दुग्धाभिषेक आदी कार्यक्रम संपन्न झाले. तर दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा शेकडो भावकांनी लाभ घेतला. या उत्सवास महिला भाविकांची लक्षनीय उपस्थिती होती.
