विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ; शिवप्रेमींचा रॅलीत उत्स्फूर्त सहभाग..
⚡सावंतवाडी ता.१९-: ढोल – ताशांच्या गजर आणी जय जय जय जय शिवाजीचा जयघोष आशा उत्स्फूर्त वातावरणात आज सावंतवाडीत स्वराज्य संघटने कडून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी युवा उद्योजक तथा भाजप नेते विशाल परब यांच्या हस्ते मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी युवराज लखम राजे भोसले यांनी मिरवणुकीत हजर लावत सहभाग घेतला.

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. येथील राजवाड्यात सर्व मावळे जमले त्या ठिकाणी श्री.देव पाटेकरला नतमस्तक झाल्यानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी उमेश कोरगावकर सुधीर आरिवडेकर, अमोल साटेलकर, श्रीपाद सावंत, सुनील पेडणेकर, दिलीप भालेकर, अशी सुभेदार, राजू कासकर आदी शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
