आंबोली,ता.१८: येथील हिरण्यकेशी येथे महाशिवरात्री निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले.बेल फुल वाहने,नारळ ठेवणे,शिव आणि गंगा दर्शन यासाठी श्रद्धेने मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. पोलीस बंदोबस्तासाठी ९ पोलीस तैनात होते. तीन बस त्याशिवाय खाजगी गाड्या घेऊन देखील भाविक मोठ्या संख्येने आले होते.यावेळी ग्रामस्थांनी देखील चांगली व्यवस्था या ठिकाणी केली होती.दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.मोठ्या उत्साहात महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी झाले.संध्याकाळी भजन आणि कीर्तन चा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.
महाशिवरात्री निमित्त आंबोली येथील हिरण्यकेशी तीर्थस्थळावर भाविकांची अलोट गर्दी
