कुणकेश्वर यात्रेला उत्साहात प्रारंभ

आ नितेश राणे यांनी सपत्नीक केली पूजा

देवगड –
दक्षिण कोकणची काशी प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा उत्सवास उत्साहात प्रारंभ होऊन १८ फेब्रु रोजी रात्री १२ वाजले नंतर देवाचे पुजारी गुरव ,ग्रामोपाध्ये,श्री मानकरी यांच्या पूजेनंतर शासकीय पूजा जिल्हापोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,उपविभागीय अधिकारी वर्षा सिंघल,, तसेच आम.नितेश राणे,सौ नंदिता राणे ,सुधीर जाधव,सौ स्नेहल जाधव, यांच्या हस्ते करण्यात आली .तहसीलदार स्वाती देसाई,नायब तहसीलदार श्रीकृष्ण ठाकूर,अरुण चव्हाण त्यानंतर देवसेवक यांनी दर्शन घेतले कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे,उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, सचिव शरद वाळके,कोषाध्यक्ष अभय पेडणेकर तसेच सदस्य संजय लाड,अजय नाणेरकर,विजय वाळके,संजय आचरेकर,प्रकाश वाळके,मंगेश पेडणेकर,अनिल धुरी,दीपक घाडी,रुपेश धुवाळी, सरपंच चंद्रकांत घाडी पदाधिकारी अध्यक्ष व सदस्य देवसेवक यांनी व उपस्थित होते.यानंतर आरती होऊन भाविकांना दर्शनास सुरुवात झाली रात्री १० वाजलेपासून भाविक दर्शन रांगांमध्ये उभे होते.या निमित्ताने आम.नितेश राणे उभयता यांचा श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ प्रतिमा भेट देऊन देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला..
: . कोरोना संक्रमणाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षीचा याचे उत्सव हा कोणत्याही निर्बंध नसलेला याचे असल्यामुळे यावर्षी भाविकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होणार असल्याचे निदर्शनास आल्याने श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता खास दर्शन रांगांची व्यवस्था करण्यात आली असून मुखदर्शन व्यवस्था करण्यात आलेली आहे.व्हीआयपी दर्शन सुविधा निर्माण करण्यात आली आहे.आपत्कालीन पर्यायी मार्ग,गर्दी नियंत्रण करीत बेरेकेटिंग व मजबूत रेलिंग करण्यात आली आहेत गर्दीची चोरी,छेडछाड,अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव खजिनदार सर्व सदस्य व्यवस्थापक, श्री देव कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई पदाधिकारी सदस्य,स्थानीक ग्रामस्थ मंडळ स्वयंसेवक याचे उत्सवात मोलाची कामगिरी बजावत आहेत.यावर्षी तीन देवस्वाऱ्या श्री देव कुणकेश्वर भेटीकरता येणार आहेत .यात प्रामुख्याने लिंगेश्वर पावणाई असरोंडी मालवण,श्री जयंतीदेवी पळसंब,श्री देव रवळनाथ वायंगणी यांचा समावेश आहे.त्या देवस्वारी समवेत समुद्र स्नानाची सोमवती अमावास्याची पर्वणी भाविकांना मिळणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत विशेष पोलीस नियंत्रण कक्ष ,महसूल नियंत्रण कक्ष, पंचायत समिती कक्ष, उभारण्यात आले असून देवस्थान ट्रस्ट मार्फत आकर्षक फुलांची सजावट ,मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे
.शनिवारी सकाळी विधानपरिषद सदस्य आम.रवींद्र फाटक, तसेच शिवसेना नेते संदेश पारकर श्री भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे,देवगड तालुका संपर्क प्रमुख संतोष परब,तालुका प्रमुख मिलिंद साटम यांनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले.त्यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यात्रौत्सवात आरोग्य विभाग पथके तैनात असून देवगड तालुका विधी सेवा समिती वकील संघटना देवगड यांच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन कक्ष उघडण्यात येऊन नागरिकांना कायदेविषयक पत्रके वाटप करण्यात आली.या कक्षाला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जे.भारूका,विधी व न्याय विभाग सचिव मुंबई मंत्रालय आर.डी. सावंत देवगड दिवाणी न्यायाधीश एस.बी वाळके यांनी भेट दिली.देवगड पंचायत समिती कक्षा मार्फत विविध योजनांची माहिती व पत्रके वाटप करण्यात येत होती.
देवस्थान ट्रस्ट स्वतंत्र स्वागत कक्ष,सुयोग्य दर्शन रांगा, आकर्षक प्रवेशद्वार,मंदिर परिसरात मोकळी जागा यामुळे गर्दीची कोंडी टाळली जात आहे.
यात्रौत्सवात प्रसिद्ध मालवणी खाजा बरोबर इळये येथील प्रसिद्ध कलिंगड बाजार विविध खेळणी दुकाने,याबरोबरच राजकीय पक्षाचे स्वागत फलक आकर्षक विद्युत रोषणाई यात्रा परिसर गर्दीने फुलून गेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे चिटणीस संतोषकुमार शिंगाडे यांचे नेतृत्वाखाली मनसे संपर्क कार्यालय यात्रेत कार्यरत होते.या वर्षी सोमवती अमावास्या पवित्र तीर्थस्नान योग असल्याने देवस्वाऱ्या समवेत स्नान करण्याकरिता रविवारी सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होणार आहेत.त्यादृष्टीने बीच वर आपत्कालीन यंत्रणा तैनात केली आहे.

You cannot copy content of this page