मालवणात निराधार योजनेची ११० प्रकरणे मंजूर

⚡मालवण ता.१९-: संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक तहसीलदार तथा संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे अध्यक्ष श्रीधर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची ६७ प्रकरणे, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेची ४३ प्रकरणे अशी एकूण ११० प्रकरणे मंजूर करण्यात आली.

बैठकीला गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, नायब तहसीलदार जी. एम. कोकरे, आर. पी. मोंडकर व्ही. टी. पाटकर उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांचे डिसेंबर २०२२ पर्यंतचे अनुदान त्यांच्या बँक खाती जमा करण्यात आले. जानेवारी २०२३ चे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खाती जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांचे अनुदान संगणक प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खाती जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.

You cannot copy content of this page