आवळेगांव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम

⚡कुडाळ ता.१८-: महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आरसीएफ तसेच ग्रामपंचायत आवळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 फेब्रुवारी रोजी पूर्ण प्राथमिक शाळा आवळेगाव क्र. 1, येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आरसीएफ तसेच ग्रामपंचायत आवळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत जनजागृती कार्यक्रम आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत किसान गप्पा गोष्टी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्रीम. घाटकर ,सरपंच श्रीम. सावंत , आहारतज्ज्ञ श्रीम. ओरोसकर , तज्ञ प्रशिक्षक महेश परूळेकर, आरसीएफ प्रतिनिधी, मुख्याध्यापिका, मंडल कृषी अधिकारी. श्री. करंदीकर, मंडल कृषी अधिकारी माणगाव श्रीम. राऊत , मंडल कृषी अधिकारी कडावल श्री. कोळी, उपसरपंच- श्री. कुपेरकर तसेच कडावल, माणगाव व कुडाळ मंडळ कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, इतर शेतकरी, महिला बचत गट, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रभात फेरीपासून करण्यात आली.यानंतर पाककला स्पर्धा संपन्न होऊन परिक्षण करण्यात आले. यानंतर उपस्थित मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले आणि पौष्टिक तृणधान्यावर आधारित छोट्याशा बालनाट्याने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

You cannot copy content of this page