निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला नाट्य समिक्षक अरुण घाडीगावकर यांनी दिली भेट

⚡कणकवली ता.१८-: तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान संदेश पत्र संग्रहातील विविध मान्यवरांची पत्रे पाहून अरुण घाडिगावकर यांनी विविध मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला.

तळेरे येथील निकेत पावसकर यांच्याकडील संदेश पत्र संग्रहात देश परदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील भारतीय पोस्ट कार्डवर संदेश पत्रे आहेत. या संग्रहाचे तळेरे येथे आगळेवेगळे अक्षरघर निर्माण केले असून त्याला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ, रुपेश रेडेकर यांनी सादिच्छा भेट दिली. यावेळी या सन्ग्रहातील अनेक संदेश पत्रे पाहताना विविध मान्यवरांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. 

You cannot copy content of this page