⚡सावंतवाडी ता.१७- माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली येथे श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचलित २० व २१ रोजी सकाळी ११ ते ४ पर्यंत विज्ञान जत्रा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम पुढीलप्रमाणे-गोवा सायन्स सेंटर पणजी यांचे सायन्स अॅान व्हीलचे प्रयोग , स्टेम लर्निग मुंबई यांचे कृतीयुक्त प्रयोग, वसुधंरा विज्ञान केंद्र नेरुरपार यांची फिरती प्रयोग शाळा , फिल्मम शो , आकाश दर्शन , शालेय विद्यार्थ्याच्या वैज्ञानिक रांगोळ्या , पर्यावरण सरंक्षण पोस्टर प्रदर्शन , सी. सी.आर.टी आझादी का अमृत महोत्सव निमित्त अनटोल्लड स्टोरीज अॅाफ फ्रीडम फायटर या कार्यक्रमात सहभागी होऊन वैज्ञानिक माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष अनंत परब शालेय समिती अध्यक्ष नागेश गावकर व मुख्याध्यापक जी एस मोर्ये यांनी केले आहे .
