परशुराम चलवाडीचा पुढाकार; स्वखर्चातून केले काम…
⚡सावंतवाडी ता.१७-: शहरातील लाखे वस्तीला गेले कित्येक वर्ष भेडसावणारा घराच्या स्लॅब गळतीचा व ड्रेनेजच्या पाईपलाईन चा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते परशुराम चलवाडी व त्यांची पत्नी सौ नीलिमा चलवाडी यांनी स्वखर्चातून मार्गी लावला. वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही न सुटणारा प्रश्न चलवाडी दंपत्याने मार्गी लावल्याने अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना सिंधुदुर्ग व श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून लाखे वस्तीतील नागरिकांनी त्यांचा खास सत्कार करत ऋण व्यक्त केले.

सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदानासमोरील लाखे वस्तीला शासनाच्या माध्यमातून घरे मिळाली आहे नगरपालिकेच्या माध्यमातून त्यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास 64 कुटुंबांना हे घरे मिळाले आहे स्लॅबच्या असणाऱ्या या घरांना काही वर्षे झाल्याने पावसाळ्यात स्लॅब निकेजचा प्रश्न लाखे वस्तीला प्रकर्षाने जाणवत होता. स्लॅब गळती सोबतच ड्रेनेजचा प्रश्नही येथे मोठ्या प्रमाणात निर्माण झाला होता घरांना ड्रेनेजसाठी बसवण्यात आलेले पाईप खराब झाल्याने येथे अस्वच्छता निर्माण होत होती. लाखेवस्तीतील नागरिकांनी या संदर्भात वेळोवेळी नगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधले होते वारंवार लक्ष वेधूनही हा प्रश्न जैसे ते होता. एकूणच यामुळे लाखेवस्तीतील नागरिकात नाराजी होती.
लाखे वस्तीला भेडसावणारा हा प्रश्न इलेक्ट्रिक वर्ष सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या परशुराम चलवाडी यांच्या कानावर येतात त्यांनी तात्काळ हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला लाखे वस्तीतील नागरिकांना विश्वासात घेत त्यांनी तब्बल चार लाख रुपये स्वखर्च करून 64 कुटुंबाच्या घरांना आतून नव्याने प्लॅस्टर व स्लॅब वर वॉटरप्रूफ प्लॅस्टर करून दिले तसेच ड्रेनेससाठी नव्याने पाईप लाईन करून या वस्तीला भेडसावणारा प्रश्न कायमचा मिटवला श्री व सौ चलवाडी यांनी लाखे वस्तीसाठी केलेले उपकार पाहून वस्तीतील नागरिकांनी एकत्र येत त्यांचा सत्कार घडवून आणत ऋण व्यक्त केले.
यावेळी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी समाज संघटना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मयूर लाखे, श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ अध्यक्ष दीपक लाखे, उपाध्यक्ष विकी लाखे,सामाजिक कार्यकर्ते अमित लाखे, नरेश खोरागडे, श्री भारत लाखे ,सौ गंगुबाई खोरागडे, रघुनाथ लाखे ,आरती खोरागडे ,छाया पाटील ,शिवाजी पाटील ,सुभाष खोडागडे आदी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना श्री व सौ चलवाडी यांनी भविष्यातही लाखे वस्तीच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहू असे आश्वासन दिले.
