क्रीडा तपस्वी कै शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ आयोजन
⚡सावंतवाडी ता.१६-: सावंतवाडीतील क्रीडा तपस्वी कै. शिवाजीराव भिसे यांच्या स्मरणार्थ पहिली ते दुसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी अनिल भिसे मित्रमंडळ यांच्याकडून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता शिव उद्यान येथे होणार असून, स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
तसेच सहभागी स्पर्धकांना देखील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 21 फेब्रुवारी पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत संतोष परब 9146704663 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अनिल भिसे मित्रमंडळ यांच्याकडून करण्यात आले आहे.
