Headlines

आकेरी येथील रथोत्सव १९ फेब्रुवारीला…

⚡कुडाळ ता.१६-: आकेरी येथील प्रसिद्ध श्री देव रामेश्वर रथोत्सव रविवारी दि. १९ फेब्रुवारी रोजी होणार आहे यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उत्सवाला दरवर्षी माघ दशमीला सुरवात होते. यावर्षी माघ दशमी बुधवार दि.१५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पुराण पालखी, तसेच १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री पहाटे भाविकांचे अभिषेख,नवस , गार्हाणे, रात्री आडदशावतार आदी कार्यक्रम होणार आहेत. तर दर्श अमावास्या रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी भाविकांचे अभिषेक, गार्हाणे, संध्याकाळी ५ वा.गायन , भजन, रात्री पुराण पालखी व श्रींची रथातून सवाद्य व फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तर यक्षिणी दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. या उत्सवात माघ दशमी पासून रथोत्सव कार्यक्रम पर्यंत रोज पुराण पालखी कार्यक्रम होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला आकेरी येथील रथोत्सव यावर्षी रविवारी येत आहे. जिल्ह्यातून या रथोत्सवाल मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. तरी याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page