⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे तांबेवाडी येथील लक्ष्मण सूर्यकांत सावंत (वय ४६) हा ईसम १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ वाजता घरात कोणालाही काही न सांगता निघून गेला आहे.दरम्यान हे घरातून निघून गेल्यावर या इसमाचा शोध घेत असताना ते हुमरमळा येथून ओरोसच्या दिशेने चालत जात असल्याचे समजले मात्र त्यांचा शोध घेऊनही अद्याप पर्यंत त्यांच्या बाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.सूर्यकांत सावंत राहणार वेताळ बांबर्डे तांबेवाडी, यांनी या घटनेची फिर्याद कुडाळ पोलिसात दिली अशी माहिती कुडाळ पोलिस स्थानकातून देण्यात आली आहे.
वेताळ बांबर्डे येथून ईसम बेपत्ता
