कणकवलीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा
⚡कणकवली ता.१६-: कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे पैशाचे पाकीट ऑटो रिक्षा स्टॅन्ड क्रमांक पाच या ठिकाणी रिक्षा चालक भालचंद्र आचरेकर यांना मिळाले.त्या प्रामाणिक रिक्षा चालकांने सदरचे पैशांचे पाकीट संबधित व्यक्ती ॲलेक्स डिसिल्व्हा यांच्याकडे प्रामाणिकपणे स्वाधीन केले.रिक्षा चालकाच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
कणकवली येथील श्रीधर नाईक चौकामध्ये पैशाचं पाकीट ऑटो रिक्षा स्टॅन्ड क्रमांक पाच या ठिकाणी रिक्षा चालक भालचंद्र आचरेकर यांना सापडले.त्यांनी लगेचच संबंधित पाकीट मालक ॲलेक्स डिसील्व्हा यांचा शोध घेतला.त्या पाकिटामध्ये महत्त्वाचे काही महत्त्वाचे कागदपत्र पत्र व पैसे होते.रिक्षा चालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.सदरचे पैशाचे पाकीट संबंधित व्यक्तीकडे स्वाधीन करण्यात आले.
यावेळी सापडलेले पैशाचे पाकीट प्रामाणिकपणे परत करत करणारे रिक्षा चालक भालचंद्र आचरेकर तसेच मंगेश सावंत, संजय सावंत, संतोष सदडेकर, उदय कानडे,महेश गोसावी, विनोद गोसावी. त्याचप्रमाणे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष नाईक उपस्थित होते.
