अरविंद जाधव यांना कलाभूषण पुरस्कार

भंडारी हायस्कूलचे कलाशिक्षक म्हणून आहेत कार्यरत;राज्य कलाध्यापक संघ सिंधुदुर्गने केले सन्मानित

मालवण (प्रतिनिधी)

माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ जिल्हा शाखा सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लिश स्कूल मळगाव येथे आज पार पडलेल्या कलाविषयक कृती सत्रात राज्य कलाध्यापक संघ सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने दिला जाणारा कलाभूषण पुरस्कार मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे कलाशिक्षक अरविंद जाधव यांना देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार श्री मनोहर राऊळ यांच्या हस्ते देण्यात आला

या कृती सत्राचे उद्घाटन मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे मुख्याध्यापक श्री. फाले, मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबईचे पदाधिकारी श्री मनोहर राऊळ महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष बी. जी. सामंत, महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष रुपेश नेवगी व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. या कृतीसत्रास जिल्ह्यातील ७० शिक्षक उपस्थित होते.

या कृती सत्राच्या सुरुवातीला माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत आयोजित कला उत्सव स्पर्धेबाबत माहिती समीर चांदरकर यांनी दिली. शासकीय रेखा कला परीक्षा संदर्भात बी.जी. सामंत व राखी अरदकर यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले गर्जा महाराष्ट्र माझा या राज्य गीताचा सराव संगीत शिक्षक प्रसाद शेवडे व उमेश कोयंडे यांनी घेतला.

You cannot copy content of this page