केंद्रशाळा खांबाळे येथे १९ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

शिवजयंती निमित्त आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रशाळा खांबाळे नं.१ सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० वा. या वेळेत रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन वैभववाडी पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. भैरी भवानी प्रतिष्ठान आचिर्णेचे अध्यक्ष अतुल रावराणे, माजी पंचायत समिती सदस्य मंगेश लोके, खांबाळे सरपंच गौरी पवार, उपसरपंच गणेश पवार, सोसायटी चेअरमन प्रवीण गायकवाड, राजेंद्र पाटील (आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती राधानगरी), सिने नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे.
या रक्तदान शिबिरात १ ते ५ क्रमांकाना लकी ड्रॉ काढण्यात येईल व सर्व सहभागी रकदात्यांना शिवप्रतिमा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात येईल. तरी या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन शिवप्रेमी मित्रमंडळाचे अध्यक्ष गुरुनाथ गुरव व सहकाऱ्यांनी केले आहे.

You cannot copy content of this page