हॉटेलमध्ये विसरलेला मोबाईल गेला चोरीला

शहरातील घटना:पोलीस करीत आहेत तपास

सावंतवाडी ता.१ ५-: शहरातील एका हॉटेलमध्ये विसरून गेलेल्या पर्यटकाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना आज दुपारी घडली आहे. संबंधित पर्यटकाला अर्ध्या वाटेत गेल्यानंतर आपला मोबाईल नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर ते पुन्हा हॉटेलपाशी माघारी परतले. मात्र, मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या पर्यटकांनी आपल्या मोबाईल हॉटेल पाशी विसरला होता. तो अर्ध्या वाटेत गेल्यानंतर आपल्याकडे मोबाईल नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर ते पुन्हा माघारी परतले असता तो मोबाईल चोरीला गेल्याचा लक्षात आहे. त्यांनी पोलिसांना कळवले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर सीसीटीव्ही द्वारे तपास करत आहेत. मात्र मोबाईल लोकेशन हा पिंगुळी कुडाळ येथे दाखवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र आता पुढील लोकेशन दाखवत नसल्याने पोलिसांना तपासाच अडचण येत आहे. मात्र आता सीसीटीव्ही द्वारे त्याचा शोध घेत आहे.

You cannot copy content of this page