नारायण राणेंबाबत केसरकर यांनी भूमिका बदलल्याने अभिनंदन

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची प्रतिक्रिया

सावंतवाडी ता.१५-: एकेकाळी केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या विरोधात बोलणारे मंत्री दिपक केसरकर आता राणें बदल चांगल बोलतात. त्याबदल केसरकर यांचे मी जाहीर अभिनंदन करतो, असे भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान राणेंची लोकसभा निवडणुकीसाठी चर्चा होत असली तरी ते भाजप वरिष्ठांवर आहे. परंतु केसरकरांनी राणें बाबत सकारात्मक बोलत असल्याने मी मनापासून आभार मानतो, असे तेली म्हणाले.

गेले काही दिवस केंद्रीय मंत्री नारायण राणें लोकसभा निवडणुक लढविणार असल्याची चर्च होती. तसे झाल्यास आपण राणे यांचा यांनी प्रचार करणार असल्याचे केसरकर यांनी जाहीर केले होते. यावर राजन तेली यांनी आज प्रतिक्रिया व्यक्त केली.

You cannot copy content of this page