नगर वाचनालयात युपीएससी, एमपीएससी वर्ग सुरू करण्याचा पालकमंत्र्यांचा निर्णय; भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.१५-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग खात्याचे तीन दिवस सेमिनार कणकवलीला होत असून त्यांच्या खात्यातून 200 कोटींचे प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील आठही नगर वाचनालय मध्ये एमपीएससी, यूपीएससी याचे वर्चुअल रूम तयार केले जाणार असून त्याला लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर जिल्हा नियोजन मधून दिलं जाईल, असे यावेळी तेली म्हणाले. ते भाजपच्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीनंतर सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलतान राजन तेली म्हणाले, जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आज ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षक मतदार संघातून निवडून आल्याबद्दल, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या खात्यातून प्रशिक्षण केंद्र मंजूर केल्याबद्दल, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय यामुळे या तिघांचे अभिनंदन करणारा ठराव यावेळी घेण्यात आला.
दरम्यान काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. सहकार्य करत नाहीत. सत्ता बदल झाले तरी अधिकाऱ्यांना समजत नाही. या सूचनांची दखल घेऊन भारतीय जनता पार्टी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्याचा आजच्या बैठकीत निर्णय झाल्याचे राजन तेली यांनी सांगितले.
