⚡कणकवली ता.१५-: माध्यमिक विद्यालय व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय बिडवाडी या प्रशालेमध्ये आनंददायी विज्ञान प्रयोगासहितचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईचे सेवानिवृत्त प्राध्यापक भगवान चक्रदेव, प्रा. केशवराव देशपांडे, विश्वनाथ देसाई, विजय बर्वे यांनी प्रयोगाच्या सहायाने विज्ञानातील गंमती व विज्ञानातील जादू अगदी हसत खेळत तीन तास शिकविल्या. सदर कार्यक्रमाचे आयोजन कल्पक चिंदरकर यांनी केले होते. सदर कार्यक्रमप्रसंगी विज्ञानातील नावीन्यपूर्ण आधुनिक प्रयोग दाखविले. कार्यक्रमावेळी बिडवाडी पंचक्रोशी शिक्षण संस्था मुंबई अध्यक्ष एम.आर.वाडेकर. शालेय समिती अध्यक्ष दत्ताराम हिंदळेकर, माजी अध्यक्ष अभिमन्यू लाड, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आनंदराव साटम, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष पांडुरंग मगर. संस्था सदस्य रामचंद्र बावकर, प्रशालेचे प्राचार्य एस. डी. जोशी, विज्ञान शिक्षक ए. के. कांबळे. सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
