श्री देव वेताळ चरणी नतमस्तक होत घेतले दर्शन
⚡मालवण ता.०६-: महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पेंडूर खरारे गावचे सुपुत्र आमदार रविंद्र चव्हाण यांनी आपल्या पेंडूर गावच्या देवीच्या मांड उत्सवास सपत्नीक भेट देत श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी व राज्याच्या विकासासाठी देवाच्या चरणी साकडे घातले. त्याचबरोबर आपला सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी देवाच्या चरणी प्रार्थना केली.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद (भाई) सावंत, जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, पेंडूर सरपंच सुनीता मोरजकर, ग्रा.प. सदस्य सुमित सावंत, अश्विनी पेडणेकर, नेहा परब, अंकिता सावंत, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, शेखर फोंडेकर, सोसायटी चेअरमन दीपा सावंत, आपा सावंत, संदेश नाईक, भाऊ पटेल, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विनायक सावंत – पटेल, सचिव अमित रेगे – कुलकर्णी, दाजी परब, रामू सावंत, मनोज राऊळ, ग्रामसेवक सौ. सापळे, देवस्थान ट्रस्ट संचालक, माजी सरपंच अनिल सावंत, पेंडूर हायस्कूलचे बाळू राणे, अमित सावंत, सागर माळवदे, मनोज वायंगणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी देवस्थान ट्रस्ट पेंडूर यांच्यावतीने पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा व त्याची पत्नी सौ. चव्हाण यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गावातील विविध मंडळे, संस्था, ग्रामस्थ यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या. काही समस्या त्यांनी तात्काळ मार्गी लावल्या. तर काही समस्या या आपण निश्चितच प्राधान्याने सोडवू असे आश्वासन दिले.
