पेंडूर मांड उत्सवाच्या निमित्ताने माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी घेतले श्री देव वेताळाचे दर्शन

⚡मालवण ता.०६-:
रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी मालवण तालुक्यातील पेंडूर येथे सुरू असलेल्या १४ दिवसांच्या देवीच्या मांड उत्सवास भेट देत श्री देव वेताळ व श्री देवी सातेरी देवीचे दर्शन घेतले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य संतोष साठविलकर, पेंडूर सरपंच सुनीता मोरजकर, ग्रा.प. सदस्य सुमित सावंत, अश्विनी पेडणेकर, नेहा परब, अंकिता सावंत, शेखर फोंडेकर, सोसायटी चेअरमन दीपा सावंत, संजय नाईक, आपा सावंत, संदेश नाईक, भाऊ पटेल, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विनायक सावंत – पटेल, सचिव अमित रेगे – कुलकर्णी, बिपीन परब, देवस्थान ट्रस्ट संचालक, दादा नाईक, अमित सावंत, सागर माळवदे, दयानंद चव्हाण ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी देवस्थान ट्रस्ट पेंडूर यांच्यावतीने निलेश राणे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेऊन आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या या समस्या आपण निश्चितच प्राधान्याने सोडवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

You cannot copy content of this page