ज्युदो सपर्धेत फोंडाघाटच्या
तन्वी पवार हिला ब्रॉन्झ पदक

 
⚡कणकवली ता.०६-: महाराष्ट्र शासन मार्फत महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित 3 व 4 जानेवारी रोजी छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ओलंपिक 2022- 23 या स्पर्धेसाठी जुदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व करणारी सिंधुदुर्ग जिल्हा आझाद झिरो असोसिएशन फोंडाघाटची खेळाडू तन्वी प्रकाश पवार हीने 63 किलो वजनी गटात चमकदार कामगिरी करत ब्रॉन्झपदक पटकावले.
    

कु. तन्वी पवार हिने ज्यूडो फेडरेशन ऑफ इंडिया च्या वतीने झालेल्या खुल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये निवड होऊन दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून 63 किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सहभाग घेणारी एकमेव खेळाडू होती तिने याही स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सर्वांची वाहवा मिळविली
     तन्वी पवार हिने मिनी ओलंपिक स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पटकविल्याबद्दल संपूर्ण फोंडाघाट परिसरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे तिला या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा आझाद जुदो असोसिएशन फोंडाघाट संस्थेचे सर्व सदस्य व प्रशिक्षक अजिंक्य पोकळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

You cannot copy content of this page